बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारताच्या गगनयान मोहिमेला हिरवा कंदील

भारताच्या गगनयान मोहिमेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. या गगनयान मोहिमेद्वारे ३ अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार असून १० हजार कोटी रूपयांच्या मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत  मंजुरी देण्यात येणार आहे.

शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. गगनयान मोहिमेला परवानगी मिळाल्याने देशाच्या अंतराळ क्षमतेत वाढ होणार आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधानांनी 2022 पर्यंत भारत अंतराळात जाईल अशी घोषणा केली होती. 2022 म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 'गगनयान'च्या माध्यमातून भारत अंतराळात तिरंगा घेऊन जाईल. देशाचा मुलगा किंवा मुलगी या मोहिवेवर भारताचा झेंडा घेऊन जाईल असेही त्यांनी सांगितले होते.