शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 21 मे 2017 (20:32 IST)

ऑपरेशनसाठी तयार राहा, हवाई दल प्रमुखांचे 12 हजार जवानांना पत्र

हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी 12 हजार जवानांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात जवानांना सध्याची वर्तमान परिस्थिती लक्षात घेता शॉट नोटीसवर कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.  30 मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रावर बी एस धनवा यांची स्वाक्षरीदेखील आहे. या पत्रात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हवाई दल प्रमुखाने जवानांसाठी पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांनी 1 मे 1950 आणि जनरल के सुंदरजी यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी अशाप्रकारचं पत्र लिहिलं होतं. धनोआ यांनी पत्रात Sub-Conventional Threat  चा उल्लेख करत जवानांनी आपल्या प्रशिक्षणावर लक्ष देण्याचा उल्लेख केला आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या शब्दाचा वापर पाकिस्तानकडून छेडण्यात येणा-या प्रॉक्सी वॉरसाठी केला जातो.  पत्रातून इशारा देण्यात आला आहे की मर्यादित साधनांमध्ये पुर्ण तयारी करुन ठेवा.