सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (12:42 IST)

स्टेजवर कार्यक्रमात कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काळ कधी आणि कोणावर झडप घालेल हे सांगता येणं कठीणच आहे. गेल्या काही महिन्यात नाचता गाता अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकू येत आहे. अलीकडे कर्नाटकाचा मंगळूर मध्ये देखील स्टेजवर कार्यक्रम करताना एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.  कर्नाटकातील मंगळुरू येथे कातिलू जत्रा सुरू आहे. अनेक कलाकार स्टेजवर डान्स करत असताना अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि तो स्टेजवरून खाली कोसळला.आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. 
 
हा कलाकार यक्षगान गटातील आहे. गुरुवप्पा बायरू असे त्यांचे नाव असून त्यांचे वय 58 वर्षे होते. मृताच्या मित्राने सांगितले की, जत्रेत यक्षगान नावाचे नाटक सुरू होते. अनेक कलाकार नाचत होते.
 
या नाटकात गुरुवप्पा बायरू हेही शिशुपालाची भूमिका करत होते. तो पूर्णपणे बरा होता, पण अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
 
Edited by - Priya Dixit