सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 21 मे 2019 (18:28 IST)

अरुणाचल प्रदेशात एका आमदारासह 11 ठार

अरुणाचल प्रदेशच्या तिराप जिल्ह्यात अज्ञान हल्लेखोरांनी एका आमदारासह 11 जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
माहितीप्रमाणे नॅशनल पीपल्स पाटीचे आमदार तिरोंग अबो हे त्यांच्या कुटुंबीयासोबत होते. अज्ञात हल्लेखोरांनी अबो आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. सर्वात आधी अबो यांची हत्या केली गेली नंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची बातमी आहे.
 
अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघातून आमदार होते. आमदार अबो तीन गाड्यांसोबत निघाले होते. एक गाडी त्यांच्या मुलगा चालवत होता. हल्लेखोरांनी पहिली गाडी थांबवून गोळीबार करायला सुरुवात केली. सर्व लढाकू अशा वेशभूषेत होते. 
 
या घटनेनंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी शोक व्यक्त केला आहे.