बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अटलजी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुलीने अंत्यसंस्कार केले

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंतिम संस्कार झाले असून ते पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या मुलगी नमिता आणि नात निहारिका यांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्या देशाच्या लोकांचे डोळे भरुन आले.  
 
अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
 
गुरुवारी रात्री वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात नेण्यात आले होते तेव्हा पूर्ण मार्गावर वाजपेयींच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. 
 
नंतर दुपारी दोनच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अंत्ययात्रेत लाखो लोकं समील झाले. भरलेल्या डोळ्याने सगळ्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.