गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (12:46 IST)

रामदेव बाबा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

भारत माता की जय’ घोषणेवरुन केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबा यांच्याविरोधात हरयाणा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मागील वर्षी रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेव बाबा यांना समन्स बजावले होते. हरयाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुभाष बत्रा यांच्या तक्रारीवरुन रामदेव बाबांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ‘भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात यावा,’ असे विधान मागील वर्षी रामदेव बाबा यांनी केले होते. ‘भारत माता की जय या घोषणेवरुन रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे,’ असे काँग्रेस नेते सुभाष बत्रा यांचे वकील ओ. पी . चुघ यांनी म्हटले. याप्रकरणी १४ जुनला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश रामदेव बाबा यांना दिले आहेत.