शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

साडेतीन वर्षाच्या मुलीचा शाळेत विनयभंग

बंगळुरु- एका साडे तीन वर्षाच्या मुलीचा शाळेच्या आवारात कर्मचार्‍याने विनयभंग केला. या कर्मचार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्मित झाले आहे.
 
बंगळुरुतील एका शाळेत साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग झाला असून सध्या ती तिच्या पालकांसोबत सु‍रक्षित आहे. आम्ही संशयितास अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
या घटनेमुळे आम्हाला इतका जबर धक्का बसला आहे की यापुढे आमची मुलं आम्ही शाळेत पाठवावी की नाही याचा आम्ही विचार करत आहोत, असे एका विद्यार्थिंनीच्या आईने म्हटले आहे. सुरुवातीला शाळेनी या घटनेची दखल घेतली नाही, परंतु पालकांनी जेव्हा दबाव टाकला त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याची तयारी दर्शवली असे एका दुसर्‍या विद्यार्थ्यांच्या पालकाने म्हटले आहे.