सणासुदीच्या पूर्वी केंद्र सरकारने महिलांसाठी केली मोठी घोषणा
देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांना मोठा दिलासा दिला आहे. राखीच्या मुहूर्तावर भारत सरकारने एलपीजीच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. या कपातीमुळे गॅसचे दर 9 वर्षांपूर्वीच्या दरावर पोहोचले आहेत. यापूर्वी एलपीजी गॅसची किंमत 1100 रुपये होती मात्र 200 रुपयांची कपात केल्यानंतर आता गॅस 900 रुपयांना मिळणार आहे. या सगळ्यात केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आणखी 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहेत. पुढील 3 वर्षांमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत ही एलपीजी कनेक्शन महिलांना दिली जातील.
पत्रकार
परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राखी आणि ओणमच्या मुहूर्तावर एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 900 रुपयांमध्ये 200 रुपये कमी भरावे लागतील.
उज्ज्वला योजनेच्या यशाचे अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि जागतिक आरोग्य यांनी कौतुक केले आहे, असे सांगून ते म्हणाले की, या योजनेमुळे महिलांच्या जीवनात बरेच बदल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, ही कुटुंबे बहुतांश लाकूड आणि कोळशावर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणही प्रदूषित होत आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.गॅसच्या दरात कपात केल्यानंतर उज्ज्वला योजनेचा सर्वाधिक लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. याआधी त्यांना गॅसवर 200 रुपये सबसिडी मिळायची पण आता 400 रुपये सबसिडी मिळणार आहे. 75 लाख एलपीजीच्या मोफत कनेक्शनच्या सरकारच्या घोषणेनंतर, देशातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटींवरून 10.35 कोटी होईल.
Edited by - Priya Dixit