1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (12:24 IST)

Ram Mandir राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण, अयोध्येत भव्य कार्यक्रम होणार

Ram Mandir
आज राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या विशेष प्रसंगी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनंदन केले आहे. सीएम योगी आज अयोध्येला पोहोचतील.
 
सीएम योगींनी भूमिपूजनच्या वर्धापन दिनानिमित्त ट्विट करून अभिनंदन केले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री योगी आज अयोध्येला पोहोचतील. योगी रामजन्मभूमीचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. याशिवाय श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमात संत आणि महंतही सहभागी होतील. योगी अयोध्येतील विकास प्रकल्पांचीही पाहणी करतील.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली होती.