गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (12:54 IST)

बिहारमधील सुपौल येथे 5 जणांनी आत्महत्या केली, या घटनामुळे खळबळ उडाली

बिहारच्या सुपौलमध्ये पाच जणांच्या सामूहिक आत्महत्येची घटना समोर आली आहेत. राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गद्दी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह घराच्या आत लटकलेल्या अवस्थेत आढळले. आजूबाजूच्या लोकांनी घराबाहेर दुर्गंधीची तक्रार केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. घरातून ताब्यात घेतलेले 5 मृतदेह मिश्रीलाल साह, त्यांची पत्नी, 2 मुली आणि एक मुलगा अशी ओळखण्यात आली आहे. या घटनेमागील आर्थिक तंगी आणि कर्जाची गोष्ट समोर आली  आहे. सामूहिक आत्महत्येने लोकांना हादरवून टाकले.
 
घटनेची माहिती मिळताच एसपी दाखल झाले – या भीषण घटनेची माहिती मिळताच आसपासच्या भागात खाळबळ उडाली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीवर राघोपूर पोलिस ठाण्याचे पोलिस पोहोचले आणि घराचे आतील भाग पाहून ते चकित झाले. माहिती मिळताच एसपी मनोज कुमार स्वत: घटनास्थळी पोहोचले.
 
पोलिस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. असे असले तरी हे प्रकरण सामूहिक आत्महत्येचे असल्याचे मानले जाते. अशी भीती ग्रामस्थही व्यक्त करीत आहेत.