मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरवर पक्ष्याची धडक , वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग

yoginath
Last Modified रविवार, 26 जून 2022 (11:43 IST)
Helicopter : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

सीएम योगींच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे सांगण्यात आले आहे. मात्र या पक्ष्याच्या धडकेनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुदैवाने या अपघातात
कोणालाही दुखापत झाली नाही.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत.

पक्षी आदळल्यानंतर हेलिकॉप्टरची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सावधगिरीने उतरल्यानंतर हा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर सीएम योगींना पर्याय म्हणून दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनौला जात होते, मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच पक्षी हेलिकॉप्टरला धडकले, त्यानंतर त्यांना उतरावे लागले.

जेव्हाही अशी घटना घडते तेव्हा हेलिकॉप्टर प्रोटोकॉल अंतर्गत उतरवले जाते. त्यानंतर तांत्रिक पथक त्याची कसून तपासणी करते आणि जोपर्यंत सर्व काही ठीक आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत व्हीआयपी हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी दिली जात नाही.
यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Yogi Adityanath :उत्तरप्रदेशचे सीएम योगींना बॉम्बने ...

Yogi Adityanath :उत्तरप्रदेशचे सीएम योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी
Cm yogi adityanath yogi :उत्तरप्रदेशातून एक मोठी खळबळजनक बातमी येत आहे. उत्तरप्रदेशचे ...

Mhow News :डीजेच्या गाडीवर तालावर नाचणाऱ्या तरुणांना करंट ...

Mhow News :डीजेच्या गाडीवर तालावर नाचणाऱ्या तरुणांना करंट लागल्याने एकाचा मृत्यू, अनेक जखमी
मध्य प्रदेशातील महूमध्ये डीजेच्या तालावर काही भक्तांना नाचणे महागात पडले. अनेक तरुण भाविक ...

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या ...

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या रांगेत उभे केल्याने सर्वत्र टीकेची झोड
एकेकाळी केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा राज्यातील ...

कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत ...

कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे-अब्दुल सत्तार
सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी ...

बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांझाने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ...

बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांझाने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांजामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.रस्त्यावर ...