शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (10:33 IST)

येत्या 25 ते 28 मे दरम्यान भाजपची संवाद यात्रा

येत्या 25 ते 28 मे या दरम्यान भाजप राज्यातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणारी  संवाद यातत्रा काढत आहे. यात  केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती भाजपकडून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद–पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदानही करणार आहेत. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या अभूतपूर्व शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत.