सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (15:10 IST)

गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉलला बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब पथक घटनास्थळी

bomb threat
हरियाणाच्या गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी  9:45 च्या सुमारास ईमेलच्या माध्यमाने देण्यात आली. माहिती मिळतातच बॉम्ब विरोधी पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. लोकांना मॉलच्या बाहेर काढण्यात आले. पोलीस आणि श्वान पथक आणि बॉम्ब निकामी पथक बॉम्बच्या शोध घेण्यासाठी मॉल मध्ये पोहोचले.पथकांनी शोध घेतल्यानंतर अद्याप कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. 
 
गुरुग्राम पोलिसांनी ईमेलची माहिती मिळवल्यावर हॉक्सचा ईमेल असल्याचे समोर आले. 
गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल कोणीतरी दिशाभूल करून खोटी माहिती देण्यासाठी पोस्ट केला आहे. अशा व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
Edited by - Priya Dixit