मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2022 (11:05 IST)

रात्रीच्या वेळी रस्त्यावर वेगाने धावणारा मुलगा , व्हिडीओ व्हायरल

सध्या रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये  रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावणारा एक 19 वर्षांचा मुलगा, ज्याच्या प्रत्येक पावलामागे त्याच्या आजारी आईसाठी उपचार आणि सैन्यात भरती करण्याचा हेतू आहे. त्या मुलाचा चेहरा घामाने भिजला होता, पण चेहरा उजळला होता. जेव्हा चित्रपट निर्माते विनोद कापरी रस्त्याने जात असताना त्यांनी त्याला धावताना  पाहिले तेव्हा त्यांनी त्याला कारने घरी सोडण्याची ऑफर दिली, परंतु अनेक वेळा विनंती करून ही त्यांनी ते मान्य केले  नाही.
 
या तरुणाचे नाव आहे प्रदीप मेहरा. हा 19 वर्षीय तरुण प्रदीप मेहरा, मॅकडोनाल्ड कंपनीत नोकरी करतो.कामा वरून सुटल्यावर दररोज तो धावण्याचा सराव करतो, कारण त्याचे स्वप्न सैन्यात भरती होण्याचे आहे. प्रदीप हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने सांगितले की तो नोएडामध्ये त्याच्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याची आई रुग्णालयात दाखल आहे.