1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

येत्या ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास ३१ जानेवारीपासून सुरु होत आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. नेहेमीप्रमाणे याही वेळी दोन टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी आणि दुसर्‍या टप्प्यात २ मार्च ते ३ एप्रिल या काळात अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीच्या बैठकीत अधिवेशन तारखांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल.
 
दरम्यान संसदेची नवी इमारत बांधण्याचे काम सुरु असून २०२२ सालापासून या इमारतीत संसदेचे कामकाज चालेल, असा विश्‍वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्‍त केला आहे. विद्यमान संसद भवनला लागूनच नवीन संसदेची इमारत उभारली जाणार आहे. २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहे. हे औचित्य साधत २०२२ पर्यंत नवीन संसद इमारत बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे.