शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (17:00 IST)

13 मार्चपासून बँक खात्यातून कितीही रक्कम काढता येणार

नोटबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध आता उठवले जाणार आहेत. येत्या 13 मार्चपासून लोकांना त्यांच्या बँक खात्यामधून कितीही रक्कम काढता येईल. रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. 
 
बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध दोन टप्प्यांमध्ये उठविण्यात येणार आहेत. सध्या बँक खात्यामधून दिवसाला 24 हजार इतकी रक्कम काढता येऊ शकते. मात्र, येत्या 20 फेब्रुवारीपासून ही मर्यादा काहीप्रमाणात वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 20 फेब्रुवारीपासून त्यांच्या बँक खात्यांमधून 50,000 रूपये काढता येतील. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळात ही मर्यादा कायम राहिल. त्यानंतर 13 मार्च रोजी बँक खात्यातून रक्कम काढण्यावरील सर्व निर्बंध उठविण्यात येणार असून ग्राहकांना दिवसाकाठी पूर्वीप्रमाणे हवी तेवढी रक्कम काढता येणार आहे.