बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (16:31 IST)

CDS हेलिकॉप्टर क्रॅश: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर

तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात बुधवारी लष्कराचे एमआय-17हेलिकॉप्टर कोसळले. घनदाट जंगलात झालेल्या या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे 14 अधिकारी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जे गंभीररित्या जळाले आहेत.
 
अपघातानंतर सुमारे तासाभरात अशी माहिती मिळाली की जनरल रावत यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले आहे, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. जनरल बिपिन रावत गंभीर जखमी झाल्याचा दावा काही अहवालात केला जात आहे. या अपघाताची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. या दुर्घटनेवर वक्तव्य देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत पोहोचले आहेत. त्यानंतर कुन्नूरला रवाना होतील.
जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी हे पद स्वीकारले. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 या काळात लष्करप्रमुखपद भूषवले होते.
जनरल बिपिन रावत यांच्याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.