नव्या निर्णयाअंतर्गत बँकेत खातं उघडण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक आहे. याशिवाय 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांमधील व्यवहारासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे काळ्या पैशांवर आळा बसेल असं म्हटलं जात आहे. सर्व बँक खातेधारकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार क्रमांक बँकेत जोडण्यास सांगितलं आहे, असं न केल्यास त्यांची बँक खाती अवैध होतील. जर कोणाला नवं बँक खातं उघडायचं असेल आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल, तर त्यांना आधार एनरोलमेंट प्रूफ द्यावा लागेल. खातं उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना आधार क्रमांक द्यावं लागेल.