शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (19:09 IST)

Chopper Crash: अपघातात फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले, गंभीररित्या जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते गंभीररित्या जखमी झाले आहे.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. 2020 मध्ये आणीबाणीच्या वेळी  LCA तेजस या लढाऊ हवाई विमान वाचवण्यासाठी त्यांना हा सन्मान मिळाला.