शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:03 IST)

कोरोनावरील लस मोफत देणार; तमिळनाडू सरकार

कोरोनावरील लस येण्याचे संकेत मिळताच विविध राज्यांमधील सरकारांकडून मोफत लसीकरणाबाबतच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या तमिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. तमिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री के. प्लानीसामी यांनी केली आहे.