मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2017 (17:25 IST)

दिल्ली : आरोग्य मंत्र्याच्या घरी सीबीआय छापा

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी छापा टाकला. सीबीआयने मनी लाँडरिंगप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या पत्नीची चौकशी केल्याचे सांगण्यात येते. यावर आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकार सीबीआयच्या माध्यमातून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. या महिन्याच्या प्रारंभी सीबीआयने सत्येंद्र जैन यांची सलग दोन दिवस चौकशी केली होती. पहिल्या दिवशी ८ तर दुसऱ्या दिवशी ५ तास चौकशी केली होती. सीबीआयने एप्रिल महिन्यात जैन यांच्याविरोधात तपास सुरू केला होता तसेच त्यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल केला आहे. सीबीआयने ४.६३ कोटी रूपयांच्या धनशोधन प्रकरणी वर्षे २०१५-१६ दरम्यान जमा केलेल्या पुराव्याच्या आधारे जैन यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.