सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 मे 2024 (11:33 IST)

Delhi Hospital Fire: दिल्लीच्या बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

delhi fire in hospital
देशाची राजधानी दिल्लीतील शहादरा येथील विवेक विहार परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. आगीतून 12 मुलांची सुटका करण्यात आली. या आगीत वाचवण्यात आलेल्या 12 नवजात मुलांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला. तर एका नवजात बालकाचा आधीच मृत्यू झाला होता. सात नवजात बालकांचा मृत्यू झाला असून, पाच नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
अधिका-यांनी सांगितले की इमारतीतून 12 नवजात बालकांची सुटका करण्यात आली मात्र सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका मुलाला मृत बाहेर काढण्यात आले. पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.32 च्या सुमारास दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहारच्या IIT ब्लॉक बी येथे असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाल संगोपन केंद्रात मुले व कर्मचारी उपस्थित होते. 
 
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि नवजात बालकांना वाचवण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत सर्वांची सुटका करण्यात आली. नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. तर वाचवण्यात आलेल्या 12 नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला.
 
तळमजल्यासह तीन मजली इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. इमारतीबाहेर उभी असलेली एक व्हॅनही पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी गोंधळ सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. 
 
शाहदरा जिल्ह्यातील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरमध्ये आग लागल्याचे समजताच इमारतीच्या मागील खिडक्या तोडून नवजात बालकांना बाहेर काढण्यात आले. आरडाओरडा होत असताना स्थानिक लोक मदतीसाठी धावले. काही वेळातच आगीने वरच्या मजल्याला विळख्यात घेतले. 
 
पोलिस आणि अग्निशमन विभागासह आजूबाजूच्या लोकांनी इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडून नवजात बालकांना एक एक करून बाहेर काढले.
 
एक नवजात मृतावस्थेत आढळून आले. तर सुटका करण्यात आलेल्या सर्व नवजात बालकांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे सहा नवजात बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
 
सातही मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाचे मालकावर कारवाई करण्यात येत आहे. 
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, दिल्लीतील विवेक विहार येथील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव शोकाकुल माता-पिता व कुटुंबीयांना देवो. या घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नवजात मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, मुलांच्या रुग्णालयातील आगीची ही घटना हृदयद्रावक आहे. या अपघातात ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत. सरकारी आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी जखमींवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जात असून या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
 
Edited by - Priya Dixit