बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (13:52 IST)

दोन मुलांसह पती-पत्नीचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु

दिल्लीतील बदली पोलीस स्टेशन हद्दीतील सिरासपूरमध्ये एकाच कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या लोकांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे संपूर्ण प्रकरण आत्महत्येचे आहे की खुनाचे आहे अजून स्पष्ट झालेले नाही. पत्नी व दोन मुलांची हत्या करून घरप्रमुखाने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पती लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि दोन लहान मुले खोलीत मृतावस्थेत आढळून आली. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना कळताच पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
 
मृत व्यक्तीचं नाव अमित (35 वर्षे), पत्नी निती (27 वर्षे), मुलगी वंशिका (6 वर्षे) आणि मुलगा कार्तिक (2 वर्षे) असे आहेत. चारही मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत.
 
माहितीनुसार हे कुटुंब बर्‍याच कालावधीपासून सिरसपूर गावात वास्तव्यास होतं. पोलिस पुढील तपास करत आहे.