शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (09:57 IST)

5 लाखांचा हुंडा परत करून तरुणाने जगासमोर आदर्श निर्माण केला

हुंडा घेणं आणि देणं हे कायदेशीरगुन्हा आहे. तरीही आज देखील भारताच्या काही भागात हुंडा देण्या-घेण्याची प्रथा सुरूच आहे. हुंड्यासाठी कितीतरी मुली बळी गेलेल्या आहेत. आज देखील हुंडा मागितला जातो. पण आज हुंड्याचे स्वरूप बदलले आहे. मुलाचा जेवढा चांगला पगार असेल हुंड्याची मागणी तेवढी केली जाते. पण आज देखील काही असे लोक आहे जे या कुप्रथेचा विरोध करतात. असेच एक उदाहरण आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातले.  सीकर येथील देवेंद्र शेखावत या  तरुणाचं लग्न  सोनू कंवर या तरुणींसह ठरले.लग्नात मुलीच्या घरातील मंडळींकडून नवरदेवाला तब्बल 5 लाख रुपयांचा हुंडा देण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे की हा हुंडा घेण्यासाठी नवरदेवाने चक्क नकार दिला. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून त्याने हुंडा घेण्यास नकार दिला. मी हुंडा घेऊन स्वतालाला विकू इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितले. हुंड्या घेण्याची आणि देण्याची ही कुप्रथा बंद करावी. या साठी मी स्वतःपासून ह्याची सुरुवात करत आहे. म्हणून मी हुंडा स्वीकारणार नाही. असे म्हणत देवेन्द्र ने  हुंड्याची रक्कम रुपये 5 लाख सासरच्या मंडळींना परत केली. त्याच्या या धाडसी निर्णयामुळे त्याने समाजासमोर एक चांगले आदर्श निर्माण केले आहे. या निर्णयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .