गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:54 IST)

हुंड्यासाठी रजिस्टर पोस्टाने दिला तीन तलाक

पीडित महिला शबनम (20) हिचा 5 मे 2016 रोजी सरदार याच्यासोबत मुस्लिम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. त्यावेळी हुंडा म्हणून शबनमच्या आई-वडिलांनी जावई सरदार यास मोटारसायकल दिली होती. मात्र दुसरी मोटारसायकल घ्यावयाची आहे असे सांगून वडिलांकडून नवीन मोटारसायकल अथवा 50 हजार रुपये घेवून ये असा तगादा त्याने तिच्याकडे लावला. मात्र त्यास शबनमने नकार दिल्याने त्याने तिला त्रास देवून शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर पती इसरार याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिले आहे.