शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जून 2018 (17:08 IST)

धुरके तयार झाल्याने दिल्लीकरांना श्वास घेण्यास त्रास

दिल्लीत धूळ आणि धुक्यामुळे धुरके तयार झाल्याने दिल्लीकरांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहायला मिळाले. या धुरक्यामुळे दिल्ली सोबतच, नोएडा, गाजियाबाद आदी ठिकाणी देखील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. हवामान विभागानुसार बुधवारी दिल्लीच्या वातावरणातील प्रदूषणामुळे पीएम १०चा स्तर ९८१, तर २.५ पीएमचा स्तर २०० इतका नोंदवला आहे. नोएडामध्ये पीएम १०चा स्तर ११३५ व पीएम २.५चा स्तर ४४४ आहे. तर, गाजियाबादमध्ये पीएम १०चा स्तर ९२२ व पीएम २.५चा ४५८ आहे. पुढील तीन दिवस अशाच प्रकारचे वातावरण राहील असा अंदाज दिल्लीच्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 
दरम्यान, हवामान तज्ज्ञानुसार, इराण व दक्षिण अफगानिस्तानमधील धुळीच्या वादळाचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.