गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (17:18 IST)

प्रदीप शर्मा पुन्हा महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल

चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. नऊ वर्षांपूर्वी त्यांना पोलीस दलातून निलंबित केले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. तसेच बनावट चकमक प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.

शर्मा यांनी जवळपास ३१२ चकमकींमध्ये भाग घेतला होता. त्यांनी शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. दाऊदसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ‘डी’ कंपनीच्या इशाऱ्यावर ते काम करत होते असाही आरोप होता. नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. या प्रकरणात त्यांना २००८ मध्ये पोलीस सेवेतून निलंबित केले होते.