गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (13:09 IST)

'शेतकरी आंदोलन 2024 पर्यंत सुरू राहणार' - राकेश टिकैत

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता 2024 पर्यंतही चालेल तसंच निवडणुकांमध्ये मोदी सरकारसमोर आव्हान उभे करू असा इशारा शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. परंतु कृषी कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत चर्चा करणार नाही अशी भूमिका असल्याचं राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे.
 
ते म्हणाले, "केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेईल असं वाटत नाही. त्यामुळे सात महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन आता 2024 पर्यंत चालेल असे वाटते. आगामी निवडणुकांमध्ये सरकारसमोर आव्हान उभे करू. पुढचे सरकार कृषी कायदे मागे घेईल अशी आम्हाला आशा आहे."26 जून रोजी शेतकरी आंदोलनात देशभरातील राभवनाला घेराव घलण्यात येणार आहे.
 
कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर शेतकरी आणि सरकार यांच्यात तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात आता राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही टिकैत यांनी केली आहे.