गांधी चतुर बनिया, अमित शहा यांनी फोडले नवीन वादाला तोंड
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षावर मोठी टीका केली आहे, मात्र यावेळी त्यांनी नवीन वाद सुद्धा ओढवून घेतला आहे. अमित शहा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चतुर बनिया असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शहा म्हणाले की जो राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेतो तो काँग्रेस हा तत्वांवर चालणारा पक्ष नाही. फक्त स्वातंत्र्यप्राप्तीच्या विशिष्ट उद्देशासाठी काँग्रेसची स्थापना झाली होती. मात्र त्यावेळी सारासार विचार गांधी यांनी केला होता. महात्मा गांधी चतुर व्यापारी होते. वो बहुत चतुर बनिया था त्यांना काँग्रेसच्या अंधकारमय भविष्याची कल्पना होती. म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता असे अमित शहा म्हणाले. त्यामुळे गांधी यांचा एकेरी उल्लेख आणि त्यांना व्यापारी म्हणणे आता शहा यांच्न्यावर टीका होत आहे. त्यामुळे आता भाजपा उत्तर द्यावे लागणार आहे.