सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (15:56 IST)

गोवा : दोन दिवसात भाजप बहुमत सिद्ध करणार

गोव्यामध्ये  सत्ता स्थापनेसाठी कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 16 मार्चला म्हणजे दोनच दिवसात सकाळी 11 वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. याशिवाय मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. तसंच नवं सभागृह अस्तित्त्वात आल्याचं आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना काढण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने तयारी केली असतानाच, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्याने मोठा पेच निर्माण झाला. अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात काँग्रेसची बाजू मांडली, तर भाजपकडून ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे मैदानात उतरले.