शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गोवा : मुख्यमंत्री पर्रिकर यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत 16 विरुद्ध 22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. सभागृहाचं कामकाज सकाळी 11.30 च्या सुमारास सुरु झाली. 40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं. तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मत केलं. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला. अशाप्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक 21 आमदारांचा आकडा सहजरित्या पार केला.