शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (16:18 IST)

रेल्वे प्रवाशाकडे सापडले तब्बल १७ किलो सोने

रेल्वेतील एका प्रवाशाकडे तब्बल १७ किलो सोनं सापडलं आहे. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेलं सोनं पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सुर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाकडे तब्बल १७ किलो सोनं सापडलं आहे. मनीष असं या प्रवाशाचं नाव असून टीसीच्या प्रसंगावधनामुळे हा प्रकार उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी मनीषला सुरत पोलिसांच्या हवाली केलं आहे. मनीष एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी आहे.
 
सुर्यनगरी एक्स्प्रेसच्या S9 कोचमध्ये मनीष प्रवास करत होता. टीसीला मनीषच्या हालचालींवरुन संशय आल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवलं. रेल्वे पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन तपासणी केली असता सोने सापडले. बाजारभावाप्रमाणे याची किंमत ५ कोटी १० लाख रुपये आहे.