मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (08:21 IST)

महाराष्ट्र सरकार खोटारडे : रेल्वेमंत्री

श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आले आहेत. ठाकरे सरकारनं 80 गाड्या मागितल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातून 65 गाड्या रिकामी परत आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.
 
पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रासाठी 145 गाड्यांची व्यवस्था केली आहे आणि स्थानकांची माहितीही त्यांना देण्यात आली होती, परंतु मोठ्या खेदानं सांगावे लागेल की, आज दुपारी 12.30वाजेपर्यंत कामगारांविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आज पाच वाजेपर्यंत 74 गाड्या महाराष्ट्रातून सुटतील, पण राज्य सरकारने 24 गाड्यांसाठीच मजुरांची व्यवस्था केली. रेल्वेमंत्री म्हणाले की, राज्यात सुमारे 50 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे परप्रांतीय मजूर तिथे अडकून पडले आहेत.