गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (07:51 IST)

लाल किल्ल्यावर हिरवा झेंडा, आक्षेपार्ह व्हिडिओ; युवक पोलिसांच्या ताब्यात

Red Fort
लाल किल्ल्यावर हिरव्या रंगाचा झेंडा फडकवितांनाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणार्‍या युवकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय 28 रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
 
सय्यद याने इंस्टाग्रामवर द्वेशाच्या, दृष्टाव्याच्या भावना वाढविण्याचे व दोन गटात शत्रुत्व निर्माण होईल या उद्देशाने व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्या क्लिपद्वारे लालकिल्ला या राष्ट्रीय स्मारकावर भारताचा राष्ट्रध्वज असताना हिरव्या रंगाचा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवितांना व्हिडीओतून दाखवून राष्ट्राचा अपमान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.