शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (10:03 IST)

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात, बस आणि ऑटोच्या धडकेत 13 ठार

मध्यप्रदेशात ग्वाल्हेरमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. जुन्या छावणीत बस आणि ऑटोच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला तर 12हून अधिक जखमी झाले आहे. पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ग्वाल्हेरमधीन आनंदपूर ट्रस्ट रुग्णालयासमोर एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. 13 जणांचा मृत्यू झाला त्यात 12 महिला आणि ऑटो चालक यांचा समावेश आहे. 
 
ऑटो क्रमांक (एपपी 07 आरए 2329)ला बसने (एमपी 07 पी 6882) धडक दिली. ऑटो ग्वाल्हेरहून मोरेना रोडकडे चमक पार्ककडे जात होता. यात अंगणवाडीतील मुलांसाठी स्वयंपाघरात काम करणार्याम महिला जात होत्या. बस मोरेनाहून ग्वाल्हेरकडे येत होती.