शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हार्दिक पटेल शिवसेनेच्या जाहीर सभेत सहभागी होणार

गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल मंगळवारी  शिवसेनेच्या जाहीर सभेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता गोरेगाव (प.) रेल्वे स्टेशनजवळील स्टर्लिंग हॉलमध्ये होणाऱ्या या जाहीर सभेत राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई व प्रभाग क्रमांक ५५चे शिवसेना उमेदवार बिरेन लिंबाचिया उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेने पालिका निवडणुकीत ६ गुजराती समाजाचे उमेदवार देऊन भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. या  जाहीर सभेसाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली असून, गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुढील सभांमध्येही गुजराती नेते आणि कलाकारांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे