रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , सोमवार, 11 जुलै 2022 (11:57 IST)

मृतदेह मांडीवर घेऊन चिमुकला

kid death
आपल्या देशात सरकारी रुग्णालयांमधील (Government Hospitals) अस्वच्छता आणि सुविधांच्या अभावामुळे होणारे रुग्णांचे मृत्यू ही नवीन गोष्ट नाही.  अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) उघडकीस आली आहे. मुरैना इथे शनिवारी एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षाच्या लहान भावाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन बसला होता. तर मुलाचे वडील पूजाराम जाटव मृत मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते.

मुरैना जिल्ह्यातील अंबाह भागातील बडफरा गावातील पूजाराम जाटव यांचा दोन वर्षांचा मुलगा राजा याची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला पूजाराम यांनी आपल्या मुलाला घरीच बरं करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाला पोटदुखी असह्य झाल्याने त्यांनी त्याला मुरैना जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यांचा मोठा मुलगा गुलशन हाही पूजारामसोबत रुग्णालयात गेला होता.  मात्र, मुरैना जिल्हा रुग्णालयात राजाचा मृत्यू झाला. गरीब पूजारामने रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे मृतदेह परत गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची (Ambulance)व्यवस्था करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी त्याची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे पूजाराम आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयाबाहेर आले आणि रस्त्यावर बसले. पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या पूजाराम जाटव यांना रुग्णालयाकडून वाहन मिळाले नाही. दुसऱ्या वाहनाने घरी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला मोठा मुलगा गुलशनला मृतदेहासह हॉस्पिटलच्या बाहेर सोडलं आणि मुलाचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था करण्यासाठी ते बाहेर पडले.