1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: भोपाळ , गुरूवार, 5 मार्च 2020 (15:44 IST)

कमलनाथ सरकार संकटात मंत्री जैस्वाल यांनी दिला इशारा

मध्य प्रदेशमधील राजकीय नाट्य सध्या रंगात आल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्री व अपक्ष आमदार असलेले प्रदीप जैस्वाल यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही कमलानाथ सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसत आहे. 
 
मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे. जर भविष्यात सरकार कोसळले तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या इच्छेचा व त्यांच्या विकासाचा विचार करता माझे सर्व पर्याय खुले राहतील असे मध्य प्रदेशमधील अपक्ष आमदार प्रदीप जैस्वाल यांनी म्हटले आहे.