मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बिजिंग , मंगळवार, 16 जून 2020 (16:58 IST)

भारताचं जोरदार प्रत्युत्तर, चीनचे 5 जवान शहीद तर 11 जखमी

भारत आणि चीन यांच्यात झालेल्या झटापटीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. मात्र भारताकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं असून चीनचे ५ जवान शहीद झाले असून ११ जण जखमी असल्याचा दावा चीनच्या माध्यमांनी केला आहे. लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीमुळे हा वाद आता आणखी वाढला आहे.
 
चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या वार्ताहराने दिलेल्या वृत्तनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीचे ५ जवान शहीद झाले आहेत. तर ११ जखमी झाले आहेत. भारताने या सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. तर लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पठाणकोट दौरा रद्द केला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलवली होती. यावेळी झालेल्या हल्ल्या संदर्भात आढावा घेण्यात आला.
 
दरम्यान, हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला जात असताना चीनने भारतावर गंभीर आरोप देखील केले आहेत. भारतीय जवानांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडली, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. तर आधी भारतीय जवानांनीच चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.