बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतीय रेल्वेने केला सर्वाधिक प्रवासी संख्येचा विक्रम

भारतीय रेल्वेने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रवासी संख्येच्या विक्रमाची नोंद केली आहे. यंदा भारतीय रेल्वेतून तब्बल ८ हजार २२१ मिलियन प्रवाशांनी प्रवास केला. २०१५-१६ या कालावधीत भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ८ हजार १५१ मिलियन इतकी होती. २०१६-१७ च्या कालावधीत यामध्ये ७० मिलियनची वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षात रेल्वेला एकूण ४७ हजार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे रेल्वेचे उत्पन्न २ हजार कोटींनी वाढले आहे. विशेष म्हणजे प्रवासी संख्येसोबतच यंदा उत्पन्नांच्या बाबतीतही भारतीय रेल्वेने उच्चांकाची नोंद केली आहे.