इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने उड्डाण रद्द, मोठा अपघात टळला
केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एक मोठा अपघात टळला. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानाला पक्ष्याने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
आणखी एक चिंतेची बाब म्हणजे जेव्हा पक्षी विमानाला धडकला तेव्हा विमानात एकूण 179 प्रवासी होते.
केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये सोमवारी सकाळी विमानाशी पक्षी धडकल्याची ही घटना घडली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाण करण्यापूर्वी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अपघातावेळी विमानात 179 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरमहून बेंगळुरूला जाणारे इंडिगोचे विमान पक्षी आदळल्याने रद्द करण्यात आले.
Edited By - Priya Dixit