भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू कश्मीर मदील गांदरबल येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत झाली. यात भारतीय जवानांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चकमक सुरू असतानाच बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. मारण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते. दहशतावाद्यांचा खात्मा केल्यानंतर भारतीय जवानांनी परीसरात सर्च ऑपरेशन करण्यात आले. सदरच्या दोन दहशतवाद्यांकडून 2 एके-47 जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.