आता आयोद्धेत उभारणार ‘महाराष्ट्र सदन’; पर्यावरण मंत्र्यांची मोठी घोषण
अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यांच्या सोयी-सुविधेसाठी इथं एक महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलणार असून महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार असल्याचे पत्रकार परिषेदत त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, अयोध्येत सुमारे १०० खोल्यांचं सदन उभा करणार असल्याची त्यांनी सांगितले. माझी ही तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही असेही त्यांनी सांगितले. मी चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे. मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी “पहिले मंदिर फिर सरकार”अशी घोषणा केली होती. त्यानुसार पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला असेही ते म्हणाले.