रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बिहारमधील उंदीर झाले दारूडे

पाटणा येथे एसएसपी मनु महाराज क्राईम मीटिंग घेत होते तेव्हा जप्त केली गेली दारूबद्दल माहिती घेतली तर ते ही आश्चर्यात पडले. त्यांना माहिती देण्यात आली की जप्त केलेली दारू स्टोअर रूम ठेवण्यात आली असून तिथे हल्ली उंदीर त्याचा आनंद घेत आहेत.
हे विचित्र वक्तव्य बिहार पोलिसांकडून आले असून आता पर्यंत 9 लाख लीटर दारू उंदीर पिऊन गेले अशी रिपोर्ट प्रस्तुत केली गेली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर तपासणीचे निर्देश देण्यात आले आहे. उंदरांवर आरोप लावल्यावर एसएसपी यांनी ठाण्यात पदस्थ सर्व पोलिसकर्मींचे ब्रेथ एनलाइजिंग टेस्ट करवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
 
ही टेस्ट ठाण्यात अचानक कधीही केली जाऊ शकते आणि यात कोणताही पोलिस अधिकारी दारू पिण्याचा दोषी सापडल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.