मोदी यांच्या सोशल मीडिया वापरावर शून्य खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियावरील वापरावर एका रुपयाचाही खर्च झाला नाही. पीएमओ अॅपही मोफत बनवण्यात आला आहे. नरेंद्र मोदी अॅपही गुगलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचा फेसबुक पेज भाजपचा मीडिया सेल सांभाळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडियाच्या वापरावर कोणताही खर्च होत नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमत्री मनीष सिसोदिया यांनी मोदींच्या सोशल मीडियावरील वापरावर किती खर्च करण्यात आला, याची माहिती माहिती अधिकाऱांतर्गत पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली होती.