शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जंगलात सापडली मोगली गर्ल, माणसांना पाहून घाबरते

जंगल बुकमधील मोगलीबाबत तर आपण ऐकलं असेलच. मोगली, लांडग्यांसोबत वाढणारा, त्यांची भाषा बोलणारा, त्यांच्यासारखा व्यवहार करणारा एक मुलगा. तसेच हा पात्र काल्पनिक आहे वा अस्तित्वात होता हे तर माहीत नाही परंतू उत्तर प्रदेशातील बहराइच जंगलात पोलिसांना दहा वर्षाची अशी मुलगी सापडली आहे वानरांच्या कळपात राहते आणि माणसांची भाषा अजिबात समजत नाही. तिचा व्यवहारदेखील जंगली जनावरांसारखा आहे.
 
कोणी तिला मोगली गर्ल तर कोणी जंगलातील गुडिया म्हणून हाक मारतं. बहुतेक तिने माणसं बघितलेच नसावे म्हणून माणसं बघितले की ती ओरडायला लागते, घाबरते आणि पळण्याचा प्रयत्नही करते. सध्या तिला बहराइचच्या जिल्हा रूग्णालयात भरती 
 
केले गेले आहे.
 
ही मुलगी डॉक्टर व इतर माणसांना बघून ओरडते. ताटात जेवण वाढल्यास ते जमिनीवर पसरवून माकडासारखे जमिनीवरून उचलून खाते. ती आपल्या दोन्ही पायांवरदेखील उभी राहू शकत नाही कारण ती माकडांप्रमाणेच दोन्ही हात आणि दोन्ही पायाने 
 
चालते.
 
या मुलीबद्दल कोणालाही अधिक माहिती नाही. परंतू काही लोकांप्रमाणे ती माकडांसोबत राहत असल्यामुळे तशी वागते. ती मुलगी नग्न अवस्थेत सापडली असून तिचे केस आणि नखंदेखील वाढलेले होते. पोलिसांप्रमाणे काही दिवसांपूर्वी गावकर्‍यांनी तिला 
 
बघितले होते आणि माकडांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला होता परंतू तेव्हा माकडांनी त्यांच्यावरच हल्ला केला. 
 
पोलिस काही दिवसांपासून तिला शोधत होती. आता डॉक्टर आणि वनकर्मी तिच्या व्यवहारात बदल आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याप्रमाणे ती हळू-हळू सामान्य होत आहे.