गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024 (09:25 IST)

एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, जादूटोण्याच्या संशयावरून शेजाऱ्याने केला घात

murder
छत्तीसगडमधील बालोदाबाजार-भाटापारा जिल्ह्यात गुरुवारी जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चार जणांची, व एका 11 महिन्यांच्या अर्भकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. पोलीस अधिकारींनी सांगितले की, पोलिसांनी या हत्येप्रकरणी गावातील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे - एक माणूस आणि त्याचे दोन मुल यांची चौकशी सुरु आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार  ही घटना कासडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छरछेड गावात संध्याकाळी घडली असून  या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी त्याच्या दोन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की आरोपीने घरात घुसून घरातील सदस्यांवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने हल्ला केला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.