बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (21:34 IST)

कितीही सुरक्षा कवच दिले तरी तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर घणाघात केला आहे. कंगणावर कायदेशीर कारवाई होणारच असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तसेच कायदेशीर कारवाईपासून केंद्राचे सुरक्षा कवचही वाचवू शकत नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
अभिनेत्री कंगना रणौतवर शीख समाजाने गुन्हा दाखल केल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, कंगना रणौतचे आक्षेपार्ह वक्तव्य सुरुच आहेत. कधी महात्मा गांधींचा अपमान करत आहे. तर कधी वेगवेगळ्या समाजाला आतंकवादी म्हणून संबोधत आहे. हे आता कोणत्याही समाजाला सहन होणार नाही. शीख समाजाच्या लोकांनी खार पोलीस स्टेशनमध्ये कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल केली आहे. निश्चितपणे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असे नवाब मलिक म्हणाले आहेत.