रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2017 (14:57 IST)

निर्भयाला न्याय, आरोपींची फाशीची शिक्षा कायम

सर्वोच्च न्यायलयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. उल्लेखनीय आहे की 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थीसोबत दिल्लीत गॅगरेप झाला होता.
याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारही आरोपींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्यात चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय 27 मार्च रोजी राखून ठेवला होता. आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात 6 आरोपी होते. ज्यातून एक रामसिंग याने तिहाड करागृहात फाशी लावून आत्महत्या केली होती तर एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे 3 वर्ष सुधारगृहात होता.