रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2017 (12:31 IST)

पुलवामामध्ये आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलाने मंगळवारी आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.  24 तासांपासून चाललेल्या या मोहीमेत आतापर्यंत एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याची माहिती समोर आली आहे. आणखी काही दहशतवादी याच परिसरात लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी  शोधमोहीम राबवण्यात येत आहे. दुसरीकडे बांदीपोरामधील परिसरातही घेरावबंदी करण्यात आली आहे. येथे दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.